दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:29 AM2019-03-27T00:29:42+5:302019-03-27T00:29:54+5:30

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.

 Two dams, fifteen ponds rolled up | दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या दुष्काळझळांची तीव्रता जाणवत आहे. मात्र निवडणुकांतील राजकीय गोंगाटात जनतेला आपला आवाज कोणी ऐकणार नाही, याची जाणीव झाल्याने निमूटपणे हे सगळे सहन करण्याची वेळ आली आहे. टंचाईत पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे बिकट आहे. मात्र निवडणुकीच्या कामाचे व आचारसंहितेचे कारण दाखवून कोरड पडलेल्या घशाने आवाज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय पुढारीही टंचाई आचारसंहितेच्या बाहेरची बाब असली तरीही यावर चकार शब्दही बोलत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावचे लोक पारावरच्या राजकीय गप्पांमध्येच टंचाईवर बोलत आहेत. इसापूर धरणात जिवंतसाठा २५२ दलघमी असून हे प्रमाण २६.२१ टक्के आहे. तर सध्या या धरणाची पाणीपाळी सुरू असल्याने विसर्गही होत आहे.येलदरी धरणात १0२ दलघमी मृतसाठा तर सिद्धेश्वर धरणात १६७.२५५ दलघमी मृतसाठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव हे जोत्याखाली गेले. तर सवड तलावात ३ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव जोत्याखाली तर घोडदरी तलावात १ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, काकडदाभा व केळी हे तलाव जोत्याखाली गेले. तर सुरेगाव ८ टक्के, औंढा ४१ टक्के, पुरजळ-२ टक्के, पिंपळदरी १९ टक्के पाणीसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ८ टक्के, बोथी १0 टक्के, दांडेगाव ३ टक्के तर देवधरी जोत्याखाली आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात १८ टक्के जलसाठा आहे. पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावही जोत्याखाली गेला आहे.
याशिवाय पाच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत एकूण १८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा ५ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १४ टक्के, परभणी तालुक्यातील राहाटी ६३ टक्के तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा तलाव कोरडा पडला आहे.
जिल्हा यंदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण आहे.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, ओढेही दुधडी भरून वाहिले नाहित. त्यामुळे यंदा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय-योजनांची मागणी होत आहे.

Web Title:  Two dams, fifteen ponds rolled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.