तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:44 AM2019-03-25T00:44:34+5:302019-03-25T00:44:50+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.

 Touched for 3 years! | तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.
यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शिरडशहापूर, सारंगवाडी येथील नळयोजनेवरील विहिरींची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने सध्या ६ ते ७ दिवसाआड नळांना पाणीपुरवठा गावकऱ्यांना होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून वारे सुटत असल्यामुळे गावातील हातपंपाचे पाणी कमी झाले आहे. तसेच गावातील एखादा हातपंप सोडला तर सर्वच हातपंप पाण्याअभावी बंद अवस्थेत आहेत. नळयोजनेवरील विहिरींचे पाणीपातळी कमी झाल्याने बाजूलाच असलेल्या सारंगवाडी व आश्रमशाळेच्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने २ ते ३ दिवसांपासून पाणी घेण्यात आले आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद हिंगोलीमार्फत राबविण्यात येणारी २३ गाव पाणीपुरवठा योजनेवर जवळपास २५ गावे अवलंबून आहेत; परंतु या योजनेचे पाणी गेल्या ३ वर्षांपासून बंद झाल्याने व या योजनेंतर्गत समाविष्ठ असलेल्या गावांना दुष्काळात पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडून कोणताच निधी खर्च करण्यात येत नसल्याने ही सर्वच गावे तहानलेलीच असतात.
यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच परिसरातील टाकळखोपा, लक्ष्मणनाईक तांडा, काळापाणीतांडा, संघनाईक तांडा, सावरखेडा, काठोडा, मार्डी, वाई, गोरखनाथ, चोंढी स्टेशन, चोंढी शहापूर आदी गावे त्या योजनेवर अवलंबून आहेत. उर्वरित काही गावे जलस्वराज्य योजना या दुरूस्तीअभावी बंद आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच टाकळखोपा व तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टाकळखोपा येथे टँकर सुरू आहे. सध्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरींना पाणी नसल्यामुळे खासगी जलस्त्रोतांवर पाण्यासाठी झुंबड उडत आहे. वाई गोरखनाथ येथे सेंदूरसना तलावातून व राजवाडी येथून गावातील विहिरीत पाणी सोडण्यात येत होते; परंतु ती योजनाही नादुरूस्त असल्यामुळे गावातील लोकांना आज पाण्यासाठी शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गावात येणाऱ्या भाविकांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. गावात कार्यक्रम असला तर नागरिक मोफत टँकरने पाणीपुरवठा करतात.
२३ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाल्यापासून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद टंचाई उपाययोजनेबद्दल फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्यामुळेच गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title:  Touched for 3 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.