अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:00 AM2019-07-05T01:00:09+5:302019-07-05T01:00:33+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.

There are still left to do 54 million classrooms | अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जमाफी : तीन वर्षांपासून सुरू आहे नुसते गु-हाळ

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. तर ६ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करणे बाकीच आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून नियोजन केले जात असले तरी अजूनही अनेक लाभार्थी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्जमाफीच्या अनुदानापासून वंचित आहेत. परंतु संथगतीने का होईना लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्यातील विविध निकषामधील ६८४०४ लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यावर ३३८.९७ कोटीं एवढी रक्कम वर्ग केली आहे. कर्जमाफीचा अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही, असे लाभार्थी मात्र संताप व्यक्त करीत आहेत. परंतु अनेकदा त्रुटींची पूर्तता करूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने असे काही शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत.
दीड लाखांच्या आतमध्ये असलेल्या ४७५३५ लाभार्थ्यांपैकी आतापर्र्यंत ४५४२६ जणांच्या बँक खात्यावर २६३.१२ कोटी जमा करण्यात आले आहेत. तर एक रक्कमी परतफेड करणाºया ५८५२ लाभार्थ्यांपैकी ३१६१ जणांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची ४८.९२ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच सतत दोन वर्ष ज्या शेतकरी सभासदांनी कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील प्रोत्साहन दिल्या जाणाºया कर्ज खातेदारांची संख्या २११४२ असून त्यापैकी आतापर्यंत १९८१७ जणांच्या खात्यावर आतापर्यंत प्रोत्साहन म्हणून २६.९२ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासनाच्या विविध निकषातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
विविध निकषामध्ये असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ६८ हजार ४०४ असून या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत शासनाकडून ३३८.९७ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.
प्रोत्साहन अनुदानसुद्धा खात्यावर वर्ग नाही
शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीची रक्कम संबधित बँकेत जमा केली. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत बँकेत ३१ मे २०१९ अखेर जमा झालेल्या रक्कम संबधितांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
ग्रीन लिस्टनुसार कर्जमाफीसाठी पात्र असणाºया लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार ५३५ एवढी होती. त्यांना २६७ कोटी रुपयांची माफी देणे अपेक्षित होते. यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्वाधिक ३६ हजार ८९२, मध्यवर्तीचे ४८६१ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७८२ लाभार्थी होते. एकरकमी परतफेडीसाठी पात्र लाभार्थी ५८५२ होते. मात्र लाभ ३१६१ जणांनीच घेतला.
या सर्व बाबींमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ग्रीनलिस्टनुसार २१ हजार १४२ होते. मात्र त्यापैकी १९ हजार ८१७ लाभार्थ्यांनाच ते अदा केले. सतत दोन वर्षे कर्जफेड करणाºयांसाठीचे हे अनुदान का दिले नाही, हा प्रश्न आहे.

Web Title: There are still left to do 54 million classrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.