औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन किराणा दुकानात चोरी; मूळ दस्तावेज व दीड लाखाचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:22 PM2018-01-10T14:22:17+5:302018-01-10T14:22:32+5:30

नागेश्वरनगरमध्ये  समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना  मंगळवारी रात्री घडली. 

theft in the Talathi office and two grocery shops at aundha | औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन किराणा दुकानात चोरी; मूळ दस्तावेज व दीड लाखाचा ऐवज लंपास 

औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन किराणा दुकानात चोरी; मूळ दस्तावेज व दीड लाखाचा ऐवज लंपास 

googlenewsNext

औंढा नागनाथ ( हिंगोली ) : येथील नागेश्वरनगरमध्ये  समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना  मंगळवारी रात्री घडली. 

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागेश्वरनगर मधील त्रिधारा व साई किराणा अशी दोन दुकाने आहेत. मंगळवारी दोन्ही व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे राञीच्यावेळी आपली दुकाने बंद केली. सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने रस्त्यावर राञी लवकरच शुकशुकाट पसरतो. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर वाकवून दुकानांत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानासह चैनीचे साहित्य लंपास केले. तसेच याच भागात असलेल्या दुधाळा व जलालदाभा या तलाठी सज्जा कार्यालयातून दुधाळा गावातील मुळ दस्तावेज चोरी झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच आज सकाळी फौजदार साईनाथ अनमोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा केला आहे. या घटनेत चोरटयांनी लहान मुलांचा वापर केला असावा,  असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे सापडली. दुकानमालक रवि गायकवाड व नवनाथ राऊत यांच्या दोन्ही दुकानातून जवळपास दीड लाख रुपयांचे साहित्य चोरी झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे.

दोन्ही दुकानासमोर असलेल्या एका घरा बाहेरील सी. सी. टिव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास मदत मिळणार असून लवकरच या घटनेचा छडा लागणार असल्याची माहिती फौजदार अनमोड यांनी दिली आहे. तसेच घटनास्थळी आज सकाळी श्वान पथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

Web Title: theft in the Talathi office and two grocery shops at aundha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.