मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:58 AM2018-12-02T00:58:59+5:302018-12-02T00:59:15+5:30

महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी व सीईओ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

 Teachers' Front for Demands | मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी व सीईओ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षक व शिक्षिका यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, एमएच सीआयटी न केलेल्या शिक्षकांना २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी, कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील शाळा बंद करू नयेत, बीएलओ व इतर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच काम करू द्यावे, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत समायोजनाने नियुक्त करू नये यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिक्षक समितीचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई दहिफळे, सुशिला मेंढके, किन्हीकर, सुगंधे तसेच डी.सी. पी.एस. धारक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष श्रीराम महाजन, विजय राठोड, शिवाजी आन्नमवार, सय्यद रफीक, अंबादास डहाळे, गंगाधर टिपरसे, नरसिंग बिरेवार, सिद्धेश्वर कानवटे, दिलीप हराळ, रामप्रसाद टाले, शिवाजी तांदळे, केशव घुगे, संतोष दराडे, राजकुमार ठाकूर, बालाजी अण्णापुरे, जे.जे. राठोड, नरेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Teachers' Front for Demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.