Struggling to drop alcohol | दारू सोडण्यास सांगितल्याने मारहाण
दारू सोडण्यास सांगितल्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पतीस दारू पिणे सोडण्यास का सांगत आहे, या कारणावरून विवाहितेस सासरच्या मंडळीनी मारहाण केल्याने ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील शास्त्रीनगर येथील पूजा अमोल गिरी या विवाहितेस सासरच्या मंडळीनी संगनमत करून मारहाण केली. ‘तू तुझ्या पतीला दारू सोडण्यास का? सांगत आहे’ या कारणावरून पूजा गिरी यांच्यासोबत वाद घातला.
यावेळी सर्वांनी संगनमत करून फिर्यादीचे हात पकडून थापड-बुक्यांनी मारहाण करत डोके कपाटावर आदळले. तसेच आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत पुजा गिरी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पुजा अमोल गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल प्रकाश गिरी (पती) तसेच किरण प्रकाश गिरी, इंदू प्रकाश गिरी, प्रकाश गिरी सर्व रा. शास्त्रीनगर यांच्याविरूद्ध कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३१ भादंविप्रमाणे हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title:  Struggling to drop alcohol
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.