धनगर समाजाचा ठिकठिकाणी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:43 AM2018-08-14T00:43:45+5:302018-08-14T00:44:08+5:30

जिल्ह्यात विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, धरणे आदी आंदोलने करण्यात आली.

 Stop the path of Dhangar community | धनगर समाजाचा ठिकठिकाणी रास्ता रोको

धनगर समाजाचा ठिकठिकाणी रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, धरणे आदी आंदोलने करण्यात आली.
पिंपळदरी फाट्यावर रास्ता रोको
औंढा नागनाथ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या सह समाजाच्या विविध मागण्यासाठी सोमवार १३ आॅगस्ट रोजी पिंपळदरी फाट्यावर दोन तास रास्ता रोको करण्यात आला, श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,
घटनेमध्ये धनगड या नावात बदल करून धनगर अशी दुरुस्ती करावी व धनगर समाजाच्या रोकलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती तत्काळ बहाल कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आले.
धनगर आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या परभणी जिल्ह्यातील योगेश कारके या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून दोन तास वाहतूक ठप्प केली होती. आंदोलनस्थळी डॉ. विलास खरात, बाबुराव पोले, शरद पोले, संतोष नाईक, अ‍ॅड. प्रदीप पोले, भास्कर पोले, प्रवीण पोले, शिवाजी बिरगळ, बालाजी नारोटे, संजय पोले, बंडू पोले, चपंतराव पोले, विलास काचगुंडे, गंगाधर देवकते, गजानन नाईक, डॉ. बेंगाळ, नंदू रवंदळे, सुरेश कुंडकर, उमेश पोले, बालाजी शिंदे, किरण पोले, नितीन पोले, ओंकार काचगुंडे, लखन शिंदे, गणेश नरोटे आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते, जि.प. सदस्य अजित मगर यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावून धनगर आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
पोलीस विभागातर्फे पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक खिजर पाशा, भीमराव चिंतारे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
शिरडशहापूर : धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले आरक्षण अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता औंढा- वसमत या मार्गावर सेंदुरसना पाटीवर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती.
आरक्षण मागणीसाठी समाज बांधव आक्रमक आहेत. यावेळी सेंदूरसना, कोर्टा, मार्डी, हिरडगाव, लोहरा व परिसरातील बांधव उपस्थित होते. मागणीचे निवेदन महसूल विभागाचे तलाठी कुलकर्णी व सपोनि शंकर वाघमोेडे यांना दिले आहे.
बाळापुरात राष्ट्रीय महामार्ग रोखला
आखाडा बाळापूर : धनगर समाजाला आरक्षण देवून अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये सामील करावे, या मागणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आखाडा बाळापूर येथे १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन २ तास चालले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे व इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वार सादर केल्या. बाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि व्यंकटेश केंद्रे, सपोनि ओमकांत चिंचोलकर यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदनावर अ‍ॅड. रवी शिंदे, किसनबापू कोकरे, कान्हा कोकरे, अमोल कोकरे, शिवाजी शिंदे पुयणेकर, दत्ता नाईक, देवानंद मुलगीर, प्रल्हाद देवकतेसह इतरांच्या स्वाक्षºया आहेत.
सेनगाव येथे दोन तास रास्ता रोको
सेनगाव : धनगर समाजाला एस.टि.मध्ये आरक्षण देण्याचा मागणी करीता तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने १३ रोजी येथील हिगोली - जिंतूर टी पॉर्इंटवर दोन तास रास्ता रोको आंंदोलन करण्यात आले. वेळी अनेकांनी भाषणे करून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली निवडून आलेल्या सरकारने शब्द फिरविल्याचा आरोप केला. यावेळी रवींद्र गडदे, गंगाराम फटांगळे, अशोक ठेंगल, पुरुषोत्तम गडदे, भागोराव पोले, अमोल हराळ, दीपक फटांगळे, बाळासाहेब गडदे, बाळासाहेब पोले, बाबाराव पोले, बाजीराव गडदे, केशवराव पोले, पंडित गडदे, विनायक हराळ, आसाराम पोले, संजय चिलगर,दिलीप कुदुर्गं, भारत गडदे आदीसह समाज बांधव सहभागी झाले होते.या वेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायक देशमुख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सतीश खाडे यांनीही हजेरी लावून पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली फौजदार जाधव, मोरे यांच्यासह मोठा फौजफाटा होता.
कुरूंदा : धनगर समाजाकडून गेल्या काही वर्षांपासून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. आता हा समाज रस्त्यावर उतरला असून, कुरूंदा, गिरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला.
कुरूंदा येथे धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीकरिता बंदचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी सकसाळपासून गावात संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावात मोटारसायकल रॅली काढून कुरूंदा फाट्यावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच गिरगाव येथेही टायर जाळून कडकडीत बंद पाळण्यात आला. कुपटी येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने वाई- पांगरा शिंदे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन पार पडले. यावेळी सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके, जमादार शंकरराव इंगोले, जमादार वाघमारे, कदम, सोनुने, राठोड आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
वसमतमध्येही दिले
निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील धनगर जमातीच्या वतीने अनुसूचित जमातीच्या घटनेप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येथील उपविभागीय अधिकाºयांमार्फत देण्यात आले.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथून धनगर समाजाचा मोर्चा निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर येऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेचे पूजनाने पुण्यतिथी साजरी करण्यासह येळकोट येळकोट जय मल्हार..., अहिल्यादेवी होळकर की जय.., आरक्षण आमच्या हक्काचे... अशा घोषणांसह निवेदन देण्यात आले.

Web Title:  Stop the path of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.