२१ फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:18 AM2019-02-08T00:18:23+5:302019-02-08T00:19:01+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

 Starting XII examination from Feb 21 | २१ फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ

२१ फेबु्रवारीपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक दहावी तसेच उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ फेबु्रवारीपासून १२ बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे. तर १ ते २२ मार्च या कालावधीत दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेबु्रवारी, मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेस एकूण १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील ३४ केंद्रावरून परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये बारावीतील कला शाखेचे ४ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर विज्ञान शाखा ७ हजार २३७, वाणिज्य ८९३ तर एमसीव्हीसी ३६१ एकूण १३ हजार २७५ बारावी परीक्षा देतील. दहावी बारावी परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील बैठे व फिरते पथक याबाबत नियोजन केले जात आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा ११ ते २ यावेळेत होणार आहे. २१ फेबु्रवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी परीक्षार्थ्यांची संख्या लक्षात घेता ३ परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहेत.
हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, जि. प. बहुविध प्रशाला, शिवाजी महाविद्यालय, सरजूदेवी भारूका आर्य कन्या विद्यालय, अमृतराव पाटील विद्यालय माळहिवरा, छत्रपती शाहू.म.उ.मा.वि आडगाव, जि.प. हायस्कूल कनेरगाव नाका, महात्मा ज्योतिबा फुले क.म.वि. कळमनुरी, गुलाब नबी आजाद उर्दू कॉलेज कळमनुरी, श्री शिवराम मोघे ज्यु.महा. कळमनुरी, नारायण वाघ क.म.वि. आखाडा बाळापूर यासह जिल्हाभरातील एकूण ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाºया बारावी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे.
जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षा कालावधीत कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार असून नियोजन करण्यात आले आहे. याबाबत केंद्र संचालकांना सूचनाही देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिली. परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी १३ विद्यार्थी केले होते रेस्टिकेट...
परीक्षा कालवधीत गतवर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी परीक्षेदरम्यान नक्कला करणाºया विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आली. परीक्षा कालावधीत एकूण १३ च्या जवळपास विद्यार्थ्यांना रेस्टिकेट करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता दहावीचे ७ तर बारावतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त शांततामय वातावरणात परीक्षा द्यावी. परीक्षा कालावधीत कोणी नकला करू नये, असे आवाहन परीक्षा मंडळातर्फे केले जात आहे.

 

Web Title:  Starting XII examination from Feb 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.