एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM2018-02-25T00:20:49+5:302018-02-25T00:20:55+5:30

तालुक्यातील बिबगव्हाण जवळ अहमदनगर-उमरखेड ही बस उलटल्याने २५ ते २८ जण जखमी झाले. त्याप्रकरणी चालक, वाहकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 The ST bus driver filed an FIR against the driver | एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल

एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील बिबगव्हाण जवळ अहमदनगर-उमरखेड ही बस उलटल्याने २५ ते २८ जण जखमी झाले. त्याप्रकरणी चालक, वाहकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तहामुल नाईक यांच्या फिर्यादीवरून बसचालक व वाहकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरखेड आगाराची बस क्र. एम.एच.४० एक्यु- ६३४५ ही अहमदनगरहून उमरखेडकडे २३ फेब्रुवारी रोजी जात होती. ही बस माळेगाव परिसरात दुपारी ४.३० वाजता आल्यानंतर वाहकाने चालकाच्या ताब्यातून बस घेवून तो चालवत होता. बस हयगय निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविली. त्यात बस रस्त्याखाली येऊन उलटली. अपघातात २५ ते २८ जण जखमी झाले. पुढील तपास फौजदार श्रीराम जामगे हे करीत आहेत.

Web Title:  The ST bus driver filed an FIR against the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.