विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:20 AM2018-12-18T00:20:14+5:302018-12-18T00:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शहरातील रिसालाबाजार परिसरात विशेष पथकाने १७ डिसेंबर रोजी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई ...

 Special squad squad | विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील रिसालाबाजार परिसरात विशेष पथकाने १७ डिसेंबर रोजी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.
हिंगोली शहरातील रिसालाबाजार परिसरात जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. यावेळी जुगार साहित्य, दोन दुचाकी व रोकड असा एकूण ६६ हजार २२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती उदयसिंग चंदेल यांनी दिली. याप्रकरणी तिघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हिंगोली शहर ठाणे हद्दीत एका ठिकाणी कारवाई करून १६८० रूपये किंमतीचा मुद्देमाल विशेष पथकाने जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकातर्फे धडक कारवाई मोहीम सुरू आहे. सोमवारी दोन ठिकाणी कारवाई करून आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले.

Web Title:  Special squad squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.