सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:40 AM2018-04-22T00:40:43+5:302018-04-22T00:40:43+5:30

नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.     

 Social responsibility should be strengthened while serving | सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.               
   जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नागरी सेवा दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदी उपस्थित होते.
  राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाज पार पाडतांना मानवी आस्था जपणे खुप आवश्यक आहे. उदारीकरणाच्या धोरण स्विकारल्यानंतर नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली. शिक्षण आणि नागरिकांना झालेल्या अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी मनीयार यांनी सांगितले. ग्राम स्वराज्य योजना आणि ग्राम विकास परिवर्तत अभियान बाबतही त्यांनी माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी बोरगावकर म्हणाले २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यानिमित्त नागरी सेवा दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. नव्या भारताची उभारणी हे या दिनाचे घोषवाक्य होय. नागरिकांच्या सनदीनुसार नागरीक हा राजा आहे. त्यांच्यासाठीच आपण सर्वजण प्रशासकीय सेवेत काम करीत आहोत. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन या दिनाचा मुख्य उद्देश समजून घ्यावा असे त्यांनी सांगितले. तसेच शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शिवाय जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब अपेक्षित आहेत असेही बोरगावर म्हणाले.
कार्यालयीन वेळेबाबत कर्मचारी अनभिज्ञ
४अनेक शासकीय कर्मचाºयांना कार्यालयीन वेळ देखील माहिती नाही. शासकीय कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ असून, सदर कर्मचारी ९.५५ नंतर कार्यालयात आल्यास त्यास लेट मस्टर मध्ये स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. तसेच ३ वेळेस उशीरा आल्यास १ दिवसाची किरकोळ रजा घेणे हा नियम आहे. परंतू याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर अनेक महत्वाची सेवा पुरविण्याचे कामे सोपविण्यात आले असून या सेवा नागरिकांना देण्यासाठी कालमयार्दा निश्चित केलेली आहे. त्याकरीता प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे अचूक व वेळत पार पाडण्याचा प्रयत्न करावा असेही बोरगावकर म्हणाले.

Web Title:  Social responsibility should be strengthened while serving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.