सहा हजार ग्राहकांची तोडली वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:22 AM2018-02-17T00:22:39+5:302018-02-17T00:22:42+5:30

महावितरणकडून सध्या जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. बिलभरणा न करणाºया सहा हजार घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक विद्युत ग्राहकांची वीज तोडण्यात आल्याचे महावितरणकडून सांग्ण्यात आले. या ४४ हजार ग्राहकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. थकित विजबिल रक्कम वसुलीचे आव्हान आता महावितरण पुढे आहे.

 Six thousand customers broke the power connection | सहा हजार ग्राहकांची तोडली वीजजोडणी

सहा हजार ग्राहकांची तोडली वीजजोडणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणकडून सध्या जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. बिलभरणा न करणाºया सहा हजार घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक विद्युत ग्राहकांची वीज तोडण्यात आल्याचे महावितरणकडून सांग्ण्यात आले. या ४४ हजार ग्राहकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. थकित विजबिल रक्कम वसुलीचे आव्हान आता महावितरण पुढे आहे.
थकीत विजबिल वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली आहे. वारंवार सूचना देऊनही विजबिल भरले जात नव्हते. त्यामुळे आता थेट वीज तोडणी मोहीमच हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. जिल्ह्यात घरगुती मीटरधारक एक लाखाच्या जवळपास आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. औंढा वगळता चारही तालुक्यातील पथदिवे बंद असल्याने शहरे अंधारातच आहेत. विजबिल वसुली मोहिमेसाठी महावितरणने पथके नेमली आहेत. बिल भरणा न करणाºया कोणांचीच गय करण्यात येणार नाही. त्यांचे थेट कनेक्शन तोडले जाणार असल्याचे महावितरणने सांगितले. मागील दोन दिवसांपासून मोहीम जिल्हाभरात राबविली जात आहे.
वारंवार सूचना देऊनही संबधित नगरपालिका व नगरपंचायतींनी महावितरणकडे थकीत विजबिल भरणा केला नाही. त्यामुळे मागील चार दिवसांपासून औंढा वगळता सेनगाव, हिंगोली, वसमत व कळमनुरी शहरातील पथदिवे बंद केले आहेत. त्यामुळे चारही शहरे अंधारात आहेत.
वसमतने पथदिव्यांच्या थकित बिलातील १४ लाख तर कळमनुरी १० लाख भरले. परंतु थकीत रक्कम येणे अजून बाकी असल्याने वीजपुरवठा अद्याप जोडला नसल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महावितरणने थकीत विजबिलापोटी ग्रा. पं. नगरपंचायत, नगरपालिकांचे पथदिव्यांचा पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले आहेत.

Web Title:  Six thousand customers broke the power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.