रेशीम उत्पादक शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:03 AM2018-10-21T00:03:28+5:302018-10-21T00:03:44+5:30

जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यांची बदली करण्याच्या मागणीचे निवेदन खा. राजीव सातव यांना २० आॅक्टोबर रोजी देण्यात आले.

 Silk producer Hareran | रेशीम उत्पादक शेतकरी हैराण

रेशीम उत्पादक शेतकरी हैराण

googlenewsNext

हिंगोली : जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यांची बदली करण्याच्या मागणीचे निवेदन खा. राजीव सातव यांना २० आॅक्टोबर रोजी देण्यात आले. जिल्ह्यात रेशीम शेती स्थिरावल्याने शेतकऱ्यांना नफाही मिळत आहे. परंतु कामानिमित्त कार्यालयात गेल्यास संबधित अधिकारी उडवा-उडवीचे उत्तरे देतात. कार्यालयाबाहेर जा असे म्हटले जाते. त्यामुळे शेतकºयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा रेशीम कार्यालयातील संबधित अधिकाºयाच्या बदलीची मागणी खा. राजीव सातव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या शेतकºयांना मागील काही दिवसांपासून मार्गदर्शन मिळत नाही. तर यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले असले तरीही यातील लाभार्थ्यांना ते अनुदान मिळत नाही. सिनगी येथील एका शेतकºयाने तर यामुळे आत्महत्या केल्याचा आरोपही केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही ‘हेतू’ मनात ठेवून हे अधिकारी अनुदान देत नसल्याचा आरोपही खासदारांसमोर शेतकºयांनी केला. तर जिल्हाधिकाºयांनाही तक्रार देणार असल्याचे सांगितले. निवेदनावर विठ्ठलराव पवार, सदाशिव पोले, अशोक पोले, कैलास पोले, जगन पुरी व शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  Silk producer Hareran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.