भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 06:31 PM2019-05-11T18:31:32+5:302019-05-11T18:36:03+5:30

मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.

sibling crushed by tipper for revenge of brother's death; One killed and another injured | भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

Next

सेनगाव (हिंगोली ) : दुचाकीवर बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणाऱ्या भावडांवर पूर्व वैमनस्यातून अंगावर टिप्पर घातल्याची घटना आज दुपारी घडली. या थरारक घटनेत एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सुभाष अर्जुन देवकर असे मृताचे नाव असून टिपर चालकाने पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले आहे. 

तालुक्यातील वटकळी येथील येल्लापा अर्जुन देवकर (३५ ) व शिवाजी किसन संत (३२) यांच्यात जुने वाद आहेत. येल्लापाने वर्षभरापूर्वी शिवाजी याचा भाऊ सुरेश यास चाकूने भोसकून जखमी केले होते. वर्षभरानंतर सुरेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर येल्लापा लोणी येथे स्थलांतरित झाला. येत्या १९ तारखेला येल्लापाच्या बहिणीचे लग्न आहे. यासाठी लग्नपत्रिका वाटण्यासाठी तो सुभाष (२५ ) या भावासोबत दुचाकीवरून सेनगावकडे दुपारी १२ वाजेच्या सुमारास येत होता.याचा सुगावा लागताच शिवाजीने टिप्परच्या ( एम.एच.३८ एक्स.०९६६) सहाय्याने पाठलाग सुरु केला.

सेनगावनजीक सुकळी पाटी येथे येल्लापा आणि सुरेश आले असता शिवाजीने भरधाव टिप्पर त्यांच्यावर घातले. यात दुचाकी चालक सुभाष जागीच ठार झाला तर येल्लापा गंभीर जखमी आहे. यानंतर शिवाजी थेट सेनगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर, फौजदार बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरु आहे. 

Web Title: sibling crushed by tipper for revenge of brother's death; One killed and another injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.