शेवाळा गावाला भिडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:24 AM2018-08-22T00:24:18+5:302018-08-22T00:24:41+5:30

आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 Shewala got water in the village | शेवाळा गावाला भिडले पाणी

शेवाळा गावाला भिडले पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे तोही मार्ग बंद पडला आहे. आखाडा बाळापूर परिसरातील सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल, सापळी, कसबे धावंडा, कोंढूर, डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव या परिसरामध्ये पुराच्या पाण्याने प्रचंड हैदोस माजवला आहे. या परिसरातील ४० टक्के शेतीमध्ये पाणी घुसले असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तहसीलदारांची पाहणी
महसूल प्रशासन या घटनेवर बारीक लक्ष ठेवून असून ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पाहणी केली असून नुकसानीचा अंदाज पूर ओसरल्यानंतर कळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
कवडी-येगाव रस्ता गेला वाहून
कळमनुरी तालुक्यातील येगावं- कवडी या भागात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले झाले आहे. येगाव ते कवडी या दोन गावांना जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. तसेच दोन्ही गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून माती वाहून गेली आहे.

Web Title:  Shewala got water in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.