हिंगोलीत कवडीमोल दराने झेंडूच्या फुलांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:49 PM2018-10-18T23:49:31+5:302018-10-18T23:49:50+5:30

शहरातील गांधी चौक येथे दसरा सणानिमित्त ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. परंतु शेतकºयांनी नाईलाजाने झेंडूची फुले कवडीमोल दराने विक्री केली जात होती.

 Selling marigold flowers at Hingoli Kavidimol | हिंगोलीत कवडीमोल दराने झेंडूच्या फुलांची विक्री

हिंगोलीत कवडीमोल दराने झेंडूच्या फुलांची विक्री

googlenewsNext

हिंगोली : शहरातील गांधी चौक येथे दसरा सणानिमित्त ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. परंतु शेतकºयांनी नाईलाजाने झेंडूची फुले कवडीमोल दराने विक्री केली जात होती. झेंडूची फुले ५ रुपये ते १० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे चित्र दसºयाच्या दिवशी दिसून आले. विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी आपला फुल शेतीमाल हैदराबाद येथे नेऊन विक्री केल्याचे सांगितले. चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी हैदराबाद येथील फुल मार्केट मध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे सांगितले. ६० ते ७० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची दोन दिवसापूर्वी हैद्राबाद येथे विक्री करून आल्याचे हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील शेतकरी गजानन टेकाळे यांनी सांगितले. परंतु हिंगोली येथे दसºयाच्या पुर्वी २० ते २० रूपये दराने फुलांची विक्री झाली.

Web Title:  Selling marigold flowers at Hingoli Kavidimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.