शाळेची जीर्ण इमारत बनली धोकादायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:28 PM2018-12-21T23:28:37+5:302018-12-21T23:33:26+5:30

शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

 The school building became dangerous! | शाळेची जीर्ण इमारत बनली धोकादायक !

शाळेची जीर्ण इमारत बनली धोकादायक !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
बेलवाडी या गावात एक ते चार वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सुमारे ६० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिकविणीसाठी दोन शिक्षक आहेत. शाळेसाठी वीस वर्षांपूर्वी ३ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. एका खोलीचे नंतर बांधकाम करण्यासत आले होते. सुरुवातीला बांधलेल्या तीन खोल्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून पडझड झाली आहे. शाळेवरील तिन्ही खोल्यांवरील टीनपत्रे खिळखिळे झाले असून भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल, याचा नेम नाही.
शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत मांडगे यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही.
शिवाय शाळा व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही. परंतु शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. बेलवाडी येथील शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन बांधकामाच्या प्रस्तावाची दखल घेण्यात यावी, व येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून आहे.

Web Title:  The school building became dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.