Response to Hingoli in Bhima-Koregaon Case | भीमा-कोरेगावप्रकरणी बंदला हिंगोलीत प्रतिसाद

ठळक मुद्देकळमनुरीत सौम्य लाठीमार : वसमतला आॅटो जाळली, डोंगरकडा, फाळेगाव फाट्यावर रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. कळमनुरीत मात्र जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर वसमत येथे आॅटो जाळून नुकसान करण्यात आले.
हिंगोली शहरात आज बंद नव्हता. गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे. मात्र नर्सी टी पॉर्इंटवर एका टिप्परवर दगडफेक झाली. गांधी चौक भागात भारिप-बमसंच्या वतीने संविधान कॉर्नर येथे जोरदार घोषणा देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर या घटनेतील आरोपी मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
सेनगाव बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : भीमा कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजयी स्तंभाजवळ झालेल्या दंगलीची सीआयडीमार्फत चौकशी करून समाजकंटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणी सह सदर घटनेचा निषेधार्थ मंगळवारी सेनगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेचे तिव्र पडसाद सेनगाव शहरात उमटले.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक संघटनेचा वतीने सेनगाव बंद चे आवाहन करण्यात आले.त्या मुळे शहरातील सर्व बाजारपेठ आज दिवसभर कडकडीत बंद होती. घटनेचा निषेध करीत. दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्च्या काढून तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. प्रकाश खंदारे, माजी सरपंच संजय वाघमारे, मनिष वाकळे, राजू वाघमारे, विजय खंदारे, सुनिल वाघमारे, वसंत वैराट, अनिल वाघमारे , गोपाल खंदारे, रमेश गायकवाड, रवि गवळी आदीसह समाज बांधव सहभागी झाले होते.
फाळेगाव पाटीवरील शाळा केल्या बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगावनाका : देवठाणा (भोयर) येथील भीम सैनिकांनी भीमा कोरेगाव येथील झालेल्या घटनेसंदर्भात ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कनेरगाव- हिंगोली राज्य महामार्गावरील फाळेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी ५० ते ६० भीमसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी देवठाणा व फाळेगाव येथील जि.प.च्या शाळा बंद केल्या. त्यानंतर राज्य मार्गावर येवून रस्त्यावर काटे, झुडपे टाकून व राज्य मार्ग बंद केला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. हिंगोली ग्रामीणचे पीआय भंडारवार तसेच सहकारी राजेश ठोके, पोले, शेख जावेद, राजू ठाकूर, कातखेडे, भिसे यांनी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी विकास धवसे, भगवान धवसे, दिलीप कांबळे, भास्कर धवसे, बाबूराव दीपके, संतोष धवसे, रमेश धवसे, सुनील वाढवे, साहेबराव धवसे, नवनाथ गायकवाड, संदीप धवसे, नंदू धवसे आदी सहभागी झाले होते.