पाटील यांचा खड्डेमुक्तीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:12 AM2018-06-25T01:12:21+5:302018-06-25T01:12:56+5:30

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअखेर जिल्हा खड्डेमुक्त करण्याचे आदेश देऊन धारेवर धरले.

 Patil's patch order | पाटील यांचा खड्डेमुक्तीचा आदेश

पाटील यांचा खड्डेमुक्तीचा आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअखेर जिल्हा खड्डेमुक्त करण्याचे आदेश देऊन धारेवर धरले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे परभणी येथे आले असता त्यांनी औंढा येथील श्री ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन घेतले. महापूजेनंतर त्यांचा संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सल्लागार डॉ. विलास खरात यांनी सत्कार केला. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स.अभियंता पीयूष लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची गोपनीय बैठक घेतली. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, सुरजितसिंह ठाकूर, सुनील देशमुख आदींनी पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला.

 

Web Title:  Patil's patch order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.