पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:26 AM2018-04-04T00:26:42+5:302018-04-04T00:26:42+5:30

शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 Panchkalyanak Mahotsav | पंचकल्याणक महोत्सव

पंचकल्याणक महोत्सव

googlenewsNext

हिंगोली : शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महोत्सव मुनीश्री १०८ अक्षय सागरजी महाराज, मुनीश्री १०८ नेमीसागरजी महाराज व क्षुलकरत्न श्री १०५ समताभूषणजी महाराज यांच्या सानिध्यात होणार आहे.
महोत्सवास आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले असून प्रतिष्ठाचार्य वाणीभूषण बा.ब्र. विनयभैय्याजी (म.प्र.) मार्गदर्शक बा.ब्र. तात्या भैय्याजी, अजय भैय्याजी, जयवर्मा भैय्याजींचे सानिध्य असणार आहे. ृ
प्रतिष्ठा महोत्सवाचे प्रमुख पात्र माता- पिता वंदना राजेंद्र महाजन, सीमा वाळले, छाया रोकडे, प्रणिता कल्याणकर, संगीता नितीन बोंद्रे, वंदना महाजन, रंजना संघई, कुसुमबाई कमलाकर महाजन, शुभांगी महाजन, नभा शीतलचंद करेवार, अचला मास्ट, सुमती येरमल, अश्विनी मास्ट, वंदना काळे, सोनल महाजन, संपदा महाजन, ललितादेवी बांडे, धनश्री परतवार, पृथ्वी सातपुते, संपदा डोळसकर, सलोनी कंदी, रश्मी सोनटक्के, प्रणाली झांजरी, संवेदिनी सोनटक्के, स्वरा बुर्से, अनुश्रृती संघई या अष्टकुमारिका असणार आहेत.

Web Title:  Panchkalyanak Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.