ट्रक पुलावरून उलटल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:55 PM2017-12-12T23:55:28+5:302017-12-12T23:55:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारंगाफाटा : नांदेड-हिंगोली रस्त्यावर वारंगा फाट्यापासून काही अंतरावर कापसाची सरकी घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कठडे तोडून ...

One killed in truck accident | ट्रक पुलावरून उलटल्याने एक ठार

ट्रक पुलावरून उलटल्याने एक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगाफाटा : नांदेड-हिंगोली रस्त्यावर वारंगा फाट्यापासून काही अंतरावर कापसाची सरकी घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कठडे तोडून खाली उतरत झाडात अडकल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
१२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गुंटूरहून खंडवा (मध्यप्रदेश) कडे कापसाची सरकी घेऊन जाणारा ट्रक क्र. एम.एच.१८ बी.ए.५२८६ वारंगाफाट्याहून काही अंतरावर पुलाचे कठडे तोडून पलटला. सदरील ट्रक हा पुल व एका झाडाच्या मधात अडकल्याने बाबुसिंग प्रतापसिंंग सिसोदिया (२५) जामुनिया सुसनेर, जि.अगरमालवा, मध्य प्रदेश यांचा एक हात, एक पाय तुटून तो जागीच ठार झाला आहे. तर नारायणसिंग करणसिंग सिसोदिया (२९) व राजेश नावाचा अन्य एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयताचे शवविच्छेदन आखाडा बाळापूर येथे करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, वारंगा बीट प्रमुख अशोक कांबळे, एस.व्ही. मांडुरके यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Web Title: One killed in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.