ई-बोलीविरोधात मोंढा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:47 PM2019-01-23T23:47:45+5:302019-01-23T23:48:34+5:30

सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.

 Mondha off against e-bid | ई-बोलीविरोधात मोंढा बंद

ई-बोलीविरोधात मोंढा बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर मोंढा पूर्ववत सुरू करण्यात आला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अडत व्यापारी व प्रशासनात ई-नाम योजनेच्या निमित्ताने वादाचा भडका उडाला. केंद्र शासनाने ई -नाम योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये ई-टेंडर पध्दतीने शेतीमाल खरेदी करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, सहाय्यक निबंधक जाधव यांनी भेट देवून व्यापाºयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ई-टेंडर पद्धतीने सर्व शेतीमाल खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. याला बैठकीतच व्यापाºयांनी तीव्र विरोध केला. ई-नाम योजनेतंर्गत बाजार समितीमध्ये ई-टेंडर पद्धतीने हळदीची खरेदी केली जात असल्याने मोंढ्यात हळदीची आवक घटल्याचा आरोप करीत या प्रणालीस विरोध केला. त्यामुळे बैठकीत व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला.
या वादातून व्यापाºयांनी मोंढा बेमुदत बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. त्यानंतर दुपारी ३ वाजेदरम्यान यासंबंधी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक योगेश आरसूड, सचिव दत्तात्रय वाघ, शिवसेना उपजिल्हा संदेश देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, भुसार असोसिएशनचे अध्यक्ष बालमुकुंद जेथलिया आदींसह व्यापारी, शेतकºयांचा उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा काढला. केवळ हळद ई-टेंडर पद्धतीने खरेदी करण्यास व्यापारी तयार झाले. त्यानंतर मोंढा पुन्हा पूर्ववत झाला.
बाजार समितीचा ई-नाम या केंद्र शासनाच्या योजनेत समावेश झाल्याने येथे आलेला शेतमाल या पद्धतीने खरेदी करावा अशा शासन स्तरावरून सूचना आहेत. मात्र व्यापाºयांचा त्याला विरोध असल्याचे प्रशासक योगेश आरसूड यांनी सांगितले.
ई-टेंडर पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी शेतकºयांचा विरोध आहे. हळदीची आवक घटली आहे. ई-नाम मधे अनेक किचकट अटी असल्याने आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया भुसार असोशिएनचे अध्यक्ष बालमुकंद जेथलिया यांनी दिली.
बुधवार आठवडी बाजार असल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. परंतु दुपारपर्यंत मोंढा बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय झाली.

Web Title:  Mondha off against e-bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.