जीवाची बाजी लावून वाचविले भोळसर व्यक्तीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:01 AM2017-12-12T00:01:57+5:302017-12-12T00:02:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : पोलीस म्हटले की नेहमीच कर्मठ व्यक्तिच डोळ्यासमोर दिसतो. मात्र पोलिसामध्येही माणुसकी असते, त्याचा खरोखरच ...

The life of an innocent person saved by police | जीवाची बाजी लावून वाचविले भोळसर व्यक्तीचे प्राण

जीवाची बाजी लावून वाचविले भोळसर व्यक्तीचे प्राण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलीस म्हटले की नेहमीच कर्मठ व्यक्तिच डोळ्यासमोर दिसतो. मात्र पोलिसामध्येही माणुसकी असते, त्याचा खरोखरच प्रत्यय आलाय ते जिवाची बाजी लावून एका भोळसर व्यक्तीला रेल्वे रुळावरुन बाजूला सारत जीवदान दिल्याने.
खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे गेटवर नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असल्याने येथे वाहतूक शाखेतर्फे एका पोलीस कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे. ११ डिसेंबर रोजी येथे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी गजानन ढाले कार्यरत होते. साडेअकराची वेळ होती अकोल्याकडून नांदेडकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे स्थानकातून सुटली होती. दरम्यान, रेल्वे गेटपासून काही अंतरावर एक भोळसर व्यक्ती त्याच्याच तो तंद्रीत रेल्वे रुळाच्या अगदी मधोमध रेल्वेस्थानकाकडे चालत जात होता. गेटवर थांबलेल्या सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. तर त्याला अनेकजण आवाजही देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचे कोणाकडेही लक्ष नव्हते. त्यामुळे पोलीस कर्मचारी गजानन ढाले यांनी कसलाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. त्याला बाजूला ढकलतात तोच एक्सप्रेस जवळून गेल्याने काही क्षणात दोघांचेही प्राण वाचले. दोघेही सुखरुप दिसल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. सर्वांनीच मग त्या भोळसर व्यक्तीकडे धाव घेतली. पण त्याला काय झाले याचेही जराही भान नव्हते.

Web Title: The life of an innocent person saved by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.