एकाच संघटनेला राज्याध्यक्ष दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:50 PM2018-10-18T23:50:58+5:302018-10-18T23:51:15+5:30

न.प.कर्मचाऱ्यांच्या एकाच नोंदणी क्रमांकावर दोन नावांच्या वेगवेगळ्या संघटना राज्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या दोन्हींचेही अध्यक्ष हिंगोली नगरपालिकेतच काम करणारे असून यावरून चालू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 Let the President of the same organization | एकाच संघटनेला राज्याध्यक्ष दोन

एकाच संघटनेला राज्याध्यक्ष दोन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : न.प.कर्मचाऱ्यांच्या एकाच नोंदणी क्रमांकावर दोन नावांच्या वेगवेगळ्या संघटना राज्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या दोन्हींचेही अध्यक्ष हिंगोली नगरपालिकेतच काम करणारे असून यावरून चालू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी हिंगोली येथील विश्वनाथ घुगे हे आहेत. मात्र तीन ते चार महिन्यांपूर्वी अचानक याच संघटनेशी नामसाधर्म्य असलेली व महापालिकेसह न.प. कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी हिंगोली येथील कर्मचारी डी.पी.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली आहे.
या नवीन संघटनेने आमचाच नोंदणी क्रमांक वापरून शासन व कर्मचाºयांची दिशाभूल करण्याचा प्रकार चालविला असल्याची तक्रार विश्वनाथ घुगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. परभणी येथील एका कर्मचाºयांनी न.प. असताना या संघटनेची नोंदणी केली होती.
आता तेथे महापालिका झाली व सदर कर्मचारीही सेवानिवृत्त झाला. शासनाने एक-दोनदा पत्रव्यवहार केला म्हणून त्यांना संस्थापक अध्यक्षही म्हणता येत नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून कुणालाही हा नोंदणी क्रमांक वापरता येणार नाही. शिवाय एवढ्या दिवसांपासून आम्हाला या संघटनेच्या नावासाठी कुणी विरोध केला नाही. तर १४ जुलैला २0१८ रोजी वार्षिक सभेत कार्यकारिणी निवड झाली. त्यामुळे बेकायदेशीर संघटना चालविणाºयांवर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणीही घुगे यांनी केली आहे. याबाबत काय निर्णय होणार ते लवकरच कळणे अपेक्षित आहे.

Web Title:  Let the President of the same organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.