कयाधू नदीला पूर : हदगावात एक शेतकरी वाहून गेला; पाच गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:17 PM2018-08-21T15:17:52+5:302018-08-21T15:19:27+5:30

दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे.

Kayadhu River floods: A farmer was missing at Hadgav; Five villages lost contact | कयाधू नदीला पूर : हदगावात एक शेतकरी वाहून गेला; पाच गावांचा संपर्क तुटला

कयाधू नदीला पूर : हदगावात एक शेतकरी वाहून गेला; पाच गावांचा संपर्क तुटला

googlenewsNext

हदगाव (नांदेड ) : दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे कयाधू नदीलापूर आला आहे. यामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच एक शेतकरी पुरात वाहून गेला असून त्याचा अद्याप शोध लागला नाही.

तालुक्यातील ऊचाडा, तालग, नेवरी, नेवरवाडी व मार्लेगाव या पाच गावांचा संपर्क कयाधू नदीच्या पुरामुळे तुटला आहे. या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरील ऊचाडा, मार्लेगाव, बाळापूर येथील शेवाळा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे यावरून वाहतूक बंद आहे. यामुळे या गावात जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नदीकाठी असलेल्या शेतीचे पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झाले आहे.

Web Title: Kayadhu River floods: A farmer was missing at Hadgav; Five villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.