तीन ते चार दिवस करावी लागते बीटची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:59 PM2019-04-10T23:59:00+5:302019-04-10T23:59:13+5:30

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत असून शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होताना दिसत आहे.

 It takes three to four days to wait for the beat | तीन ते चार दिवस करावी लागते बीटची प्रतीक्षा

तीन ते चार दिवस करावी लागते बीटची प्रतीक्षा

Next

राहुल टकले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत असून शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होताना दिसत आहे.
येथील हळदीचा मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद घेऊन येतात. मात्र बिट होण्यासाठी तीन दिवस व वजन करण्यासाठी एक दिवस असा चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजार समितीमध्ये शेतकºयांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. नळाला पाणी आहे मात्र फ्रीजर बंद असल्याने शेतकºयांना गरम पाणी प्यावे लागते. स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. मार्च एण्डमुळे मोंढा चार दिवस बंद होता. त्यानंतर अचानक हळदीची आवक वाढली. रोज जवळपास ३ ते ४ हजार पोत्यांची आवक होत आहे. येथील हळदीच्या मोंढ्यात ७ एप्रिल रोजी हळद घेऊन आलेले शेतकरी नारायण डोईफोडे यांच्या हळदीची बिट ९ एप्रिल रोजी झाली. त्यामुळे त्यांना चार दिवस मोंढ्यात ताटकळत बसावे लागले आहे. शेतकºयांना हळदीच्या पोत्यावर झोपून रात्र काढावी लागत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोणत्याही सुविधा शेतकºयांना दिल्या जात नाहीत. शिवाय रात्री हळदीचे पोते चोरी झाल्याच्या घटना घडत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रभर जागे राहून हळदीची राखण करावी लागते. हळदीचा मोंढा टिनपत्रांच्या शेडमध्ये असल्याने दिवसभर उकाड्याचा त्रास तर रात्री हळद चोरी जाण्याच्या भीतीने शेतकºयांना झोप घेणेही कठीण झाले आहे.
प्रतिक्रिया: व्यापारी बीट सुरु करु देत नाहीत
पूर्वी आठ दिवसांतून दोन दिवस बीट व्हायची. आता आवक वाढल्याने सोमवारी, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बीट होते. सोमवारी आवक जास्त झाली होती. त्यामुळे शेतकºयांना थांबावे लागले आहे. ज्या दिवशी बीट बंद असते त्या दिवशी वाहनांना मोंढ्यात प्रवेश दिला जात नाही. बिटच्या दिवशी सकाळी ७ ते १२ या वेळेत सर्व वाहनांना मोंढ्यात प्रवेश दिला जातो. बीट १२ वाजेला सुरु करण्याची प्रथा आहे. मात्र व्यापारी इतर बाजारपेठेतील भाव तपासल्याशिवाय बीट सुरु करु देत नाही. मनुष्यबळही कमी असल्याने शेतकºयांना त्रास होत आहे.
बाजार समितीमधील पाण्याचे फ्रीज बंद असल्याने त्याला गरम पाणी असते. त्यामुळे शेतकºयांना पाणी विकत घ्यावे लागते. एका लिटरसाठी पाच रुपये मोजावे लागत असल्याने विक्रेत्यांची चांदी होत आहे.
रविवारी १० पोते हळद घेऊन आलो. मंगळवारी दुपारी ३ वाजता बीट झाली. हळदीचे वजन बाकी असल्याने बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत थांबावे लागणार आहे. जेवन व चहापाण्यासाठी रोजचा ३०० रुपये खर्च येतो. एका पोत्याची किंमत खर्चातच गेली. बाजार समिती कोणत्याच सुविधा देत नसल्याने पाण्यासह सर्वच विकत घ्यावे लागले.
-नारायण डोईफोडे, शेतकरी, रा. वाढोना ता. सेनगाव
चार दिवसांपासून हळदीची आवक वाढल्याने शेतकºयांना जास्त दिवस थांबावे लागत आहे. सोमवारी आलेल्या शेतकºयांना तीन दिवस थांबावे लागले. आता एक ते दोन दिवसात बीट होऊन शेतकरी मोकळे होणार आहे. सोमवारी मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक झाल्याने बीट होण्यास विलंब झाला.
-लक्ष्मीकांत पुरोहित, व्यापारी कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली

Web Title:  It takes three to four days to wait for the beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.