मराठा वसतिगृहासाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:08 AM2018-09-19T01:08:48+5:302018-09-19T01:09:03+5:30

सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतरही मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध झाले नाही. या वसतिगृहासाठी जागेची पाहणी आज करण्यात आली.

 Inspection of the place for the Maratha hostel | मराठा वसतिगृहासाठी जागेची पाहणी

मराठा वसतिगृहासाठी जागेची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतरही मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध झाले नाही. या वसतिगृहासाठी जागेची पाहणी आज करण्यात आली.
१५ आॅगस्टला आंदोलकांना आश्वासन देत मराठा समाजाच्या मुलांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्याचे आश्वासन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले होते. यासाठी जागेचा शोध सुरू होता. मात्र योग्य ठिकाण मिळत नसल्याने प्रशासन थंडावले होते. त्यानंतर पुन्हा १७ सप्टेंबरला हा मुद्दा समोर आला. त्यानंतर आज पाहणीस आ.तान्हाजी मुटकुळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सुनील पाटील गोरेगावकर, प्रकाश थोरात, रामेश्वर शिंदे, मनीष आखरे आदी उपस्थित होते. आ.मुटकुळे म्हणाले, पाहणी केली. मात्र यासाठी आधी शासन मंजुरीचे पत्र आणून निविदा काढू. ३0 सप्टेंबरपर्यंत हे सर्व करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title:  Inspection of the place for the Maratha hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.