कळमनुरीत निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:39 AM2018-05-22T00:39:42+5:302018-05-22T00:39:42+5:30

इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली.

 Incomprehensible dehydrated | कळमनुरीत निर्जळी

कळमनुरीत निर्जळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली.
इसापूर धरणाची पाणीपातळी खालावल्यामुळे टाकीमध्ये पाणी संकलित होण्यास अडचण जात आहे. २२ मे रोजी धरणाजवळ १० व २० एचपीच्या विद्युत मोटारी लावून पाणी टाकीमध्ये जमा करण्यात येणार आहे. पाणी टाकीमध्ये जमा झाल्यास २ ते ३ दिवसांत शहराला पाणीपुरवठा केला जाईल. सूर्यवंशी, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, गव्हाणकर, दायमा, दरक, सुभाष काळे आदींनी तेथे पाहणी केली.

Web Title:  Incomprehensible dehydrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.