परस्पर रोहित्र दिल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:56 PM2018-11-22T23:56:20+5:302018-11-22T23:56:39+5:30

रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.

 If you give mutual interest, then foreclosure | परस्पर रोहित्र दिल्यास फौजदारी

परस्पर रोहित्र दिल्यास फौजदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुटकुळे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली. यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांच्यासह सर्वच उपअभियंत्यांची उपस्थिती होती. तर रोहित्र दुरुस्तीच्या एजन्सीजही बोलावल्या होत्या. यावेळी मिनियार यांनी महावितणच्या अधिकाºयांना रोहित्र दुरुस्तीतील अडचणी विचारल्या. त्यात आॅईलची समस्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र १00 रोहित्र दुरुस्ती होतील, एवढे आॅईल परभणीला आले. तेथून आणल्यावर येत्या पाच दिवसांत एवढ्या डीपींची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले. तर दुरुस्तीच्या दराचा प्रश्न आधीच मिटल्याचे सांगण्यात आले. जवळपास १00 डीपी आधीच दुरुस्तीचे पडून असून या एजन्सींना दुरुस्तीस दिलेल्या डीपींची संख्याही ९0 च्या घरात आहे. त्यामुळे एजन्सीकडे डीपी तत्काळ दुरुस्तीसाठी पाठवून त्याची यादी सादर करण्यास मिनियार यांनी सांगितले. तर सध्या २१ डीपी दुरुस्त केलेले असून उद्या १२ आणखी मिळतील, असे सांगण्यात आले.
आॅईल पुरवठा झाल्याने रोहीत्र दुरुस्त तत्काळ व्हावी. एक वर्षांच्या गॅरंटी काळात रोहित्र जळाल्यास तत्काळ दुरुस्त करून द्यावे, त्याची वेगळी यादी तयार करावी, अशा सूचनाही मुटकुळे यांनी दिल्या. तर परस्पर रोहित्र वाटपाची चौकशी करण्यासही सांगितले.
वेदना समजून घ्या : अधिकाºयांना सुनावले
प्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांना मुटकुळे म्हणाले, आपणही शेतकरीपुत्र आहात. एक महिना डीपी न दिल्यास काय घडते, हे माहिती आहे. मग शेतकºयांच्या वेदना का समजून घेत नाहीत, असा सवाल केला. एजन्सीज परस्पर डीपी देतात, वीजचोरी रोखण्याचा पत्ता नाही. वीजचोरांवर कठोर कारवाई करा. यात लक्ष न घालणाºया अभियंत्यावरही कारवाई करा. वीजचोरांमुळे प्रामाणिक लोकांचे मरण नको. प्रतीक्षा यादीनुसार डीपी द्या. परस्पर डीपी देण्याच्या प्रकारामुळे असंतोष निर्माण होत आहे.
शासनाने थकबाकी वसुुली करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आपण सक्ती करू नका, असे आ.मुटकुळे म्हणाले. तर डीपी जळाल्यास वेगळा निर्णय असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. त्यावर ही वसुली तर थकबाकीचीच असल्याचे सांगून सक्ती नको, असे मुटकुळे म्हणाले.

Web Title:  If you give mutual interest, then foreclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.