फळबाग योजनेला जाचक अटींचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:28 AM2018-07-21T00:28:53+5:302018-07-21T00:29:23+5:30

जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल्याने नव्यांचा हिरमोड होत आहे.

 Horticulture Bills | फळबाग योजनेला जाचक अटींचे काटे

फळबाग योजनेला जाचक अटींचे काटे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल्याने नव्यांचा हिरमोड होत आहे.
खरेतर या योजनेत राज्यासाठी १00 कोटी रुपये जाहीर होवून पूर्ण जून महिना लोटला. अर्ज वेबसाईटवर टाकयला अर्धा जुलै लागला. त्यातही आॅनलाइनची तांत्रिक अडचण अर्ज दिसूच देत नाही. हिंगोली हा मागास जिल्हा आहे. सिंचन क्षेत्रही अल्प आहे. आता १.८0 कोटींत किती जणांचे समाधान होणार हा प्रश्नच आहे. या योजनेसाठी आंबा कलम प्रति हेक्टरी १०० झाडांसाठी अनुदान मर्यादा रुपये ५३ हजार ५६१, आंबा कलमासाठी १ लाख १ हजार ९७२ , काजू कलमे साठी ५५ हजार ५७८, पेरु कलमे सधन लागवडीसाठॅ २ लाख २ हजार ९०, पेरू कलमेसाठी ६२ हजार २५३, डाळिंब कलमेसाठी १ लाख ९ हजार ४८७, संत्रा- मोसंबी कागदी लिंबू कलमे ६२ हजार ५७८, संत्रा कलमे इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान ९९ हजार ७१६ , ५९ हजार ६२२, नारळ रोपे बाणावल- ५९ हजार ६२२ , नारळ रोपे टी/डी- ६५ हजार २२ , सीताफळ कलमे- ७२ हजार ५३१, आवळा कलमे - ४९ हजार ७३५ , चिंच कलमे - ४७ हजार ३२१ ,जांभूळ कलम- ४७ हजार ३२१, कोकम कलम- ४७ हजार २६०, फनस कलमे-४३ हजार ५९६ , अंजीर कलमे- ९७ हजार ४०६ , चिकू कलम- ५२ हजार ६१ रुपये प्रतिहेक्टरी कमाल अनुदान मिळणार आहे.
योजनेच्या जाचक अटी
सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकºयांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकºयांचा विचार करण्यात येईल. कुटुंबाची व्याख्या - पती पत्नी व अज्ञान मुले!, महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाºयांना या नरेगाच्या योजनेचा प्रथम फायदा घेतल्यानंतरच उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळभाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल, प्रत्येक तालुक्यात प्राप्त होणाºया आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्याची निवड होेईल, लाभर्थ्याना कृषी विद्यापीठांनी कृषी हवामान क्षेत्राकरिता शिफरस केलेल्या फळपिकांच्या वाणांची व अंतराच्या शिफारसीनुसार लागवड करणे बंधनकारक राहील, योजनेअंतर्गत केवळ कलमांच्या लागवडीला नारळ वगळता अनुदान देय राहील, फळपिकांची कलमे रोपे प्राधान्याने शसकीय, कृषी विद्यापीठ, राष्टÑीय संशोधन संस्था व राष्टÑीय बागवानी मंडळ मानांकित रोपवाटिकेतूनच घेणे बंधनकारक राहील, लाभार्थ्यांना शसकीय वा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतील उपलब्ध कलमे/रोपे उधारीवर देण्यात यतील.अनुदान थेट संबंधित संस्थेस अदा करण्यात येईल, राष्ट्रीय बागवानी मंडळ मानांकित रोपवाटिकेतील कलमे/ रोपांच्या गुणवत्तेची जबाबदरी संबंधित रोपवाटिकाधारकांची यराहील. सदर रोपवाटिकेतून लाभार्थ्यांनी स्वताच्या जबाबदारीवर कलमे/ रोपे खरेदी करावीत तथापि, कलमे/ रोपांचे अनुदान लाभार्थ्यांचा आधार संलग्न बॅक खात्यावर जमा करण्यात येईल, अशा अनेक अटी घातलेल्या आहेत.

Web Title:  Horticulture Bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.