हिंगोली येथे हॉकी स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:42 AM2018-12-11T00:42:04+5:302018-12-11T00:43:03+5:30

हिंगोली अ‍ॅमेच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन व स्व.बलभद्रजी कयाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राष्टÑीय हॉकी स्पर्धेस १० डिसेंबरपासून प्रारंभ झाला.

 The hockey tournament started in Hingoli | हिंगोली येथे हॉकी स्पर्धेस प्रारंभ

हिंगोली येथे हॉकी स्पर्धेस प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोली अ‍ॅमेच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन व स्व.बलभद्रजी कयाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राष्टÑीय हॉकी स्पर्धेस १० डिसेंबरपासून प्रारंभ झाला. शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान हॉकी स्पर्धा सुरू असून देशभरातून ३८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उदघाटन आ. तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राम कयाल, कमलकिशोर काबरा, बाबा नाईक, नवनीत राठोर, राजू जैस्वाल, गोपाल दुबे, हरिसेठ कयाल, नाना नायक, घनश्याम तापडीया, मनीष कयाल, नारायण बांगर आदी उपस्थित होते. हिंगोली येथे मागील दहा वर्षांपासून हॉकी स्पर्धा झाल्या नाहीत. १० डिसेंबरपासून राष्टÑीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. १० ते १६ डिसेंबर या कालावधीत हॉकी स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेत ३८ संघ सहभागी
राष्टÑीय हॉकी स्पर्धेत देशभरातील ३८ संघ सहभागी झाले आहेत. १० डिसेंबर रोजी पहिला सामना जळगाव विरूद्ध बालाघाट (मध्यप्रदेश) यांच्या रंगला. यावेळी बालाघाट संघाने जळगाव संघाचा पेनाल्टी स्ट्रोकमध्ये ५-३ ने पराभव केला. सामनावीर शेख मुस्तफा हे ठरले. तर दुसरा सामना औरंगाबाद विरूद्ध वर्धा यांच्यात झाला. वर्धा संघाने औरंगाबाद संघाचा ३-२ ने पराभव केला. सामनावीर भगवान पवार, तर तिसरा सामना बर्वानी विरूद्ध नांदेड यांच्यात झाला. बर्वानी ५-३ ने विजयी तर नांदेड संघाचे बाबू यांना दिला. चौथा सामना जीनखाना हैदराबाद विरूद्ध अमरावती यांच्यात रंगला. यात स्ट्रॉक २-०ने जीमखाना हैदराबादचा संघ विजयी झाला. सामनावीर पुरस्कार अमरावती संघाचे तोहिदअली यांना देण्यात आला. पंच म्हणून ओझा, सय्यद आवीद, गुणानंद झा, सैफुद्दीन, सुनील नायर, विकास कोरी आदींनी काम पाहिले. ११ डिसेंबर रोजी सहा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशी माहिती अजयसिंग यांनी दिली. यशस्वीतेसाठी प्रा. आनंद भट्ट, सुरेंद्र साहू, केशव दुबे, सचिन शर्मा, जितेंद्र भट्ट, फुलचंद जैस्वाल, प्रेमसिंग, विशाल मुदीराज आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  The hockey tournament started in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.