हिंगोलीत दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:38 AM2018-04-24T00:38:25+5:302018-04-24T00:38:25+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवारी एकदिवसीय बोंबाबोब आंदोलन केले. असे आंदोलन पहिल्यांदाच झाल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे दिव्यांग आकर्षण ठरले होते.

 Hingoliite Divyanang's Bombay Babon movement | हिंगोलीत दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन

हिंगोलीत दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवारी एकदिवसीय बोंबाबोब आंदोलन केले. असे आंदोलन पहिल्यांदाच झाल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे दिव्यांग आकर्षण ठरले होते.
जिल्ह्यात अंध, अपंग अनाथ मुलांसाठी गेली २ ते ३ वर्षापासून दिव्यांग प्रतिष्ठान ग्रुप काम करीत आहे. जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्याकडे असलेला स्थानिक अपंग ३ टक्के निधी खर्च करावा, अंध, अपंग, अनाथ मुलांना संजय गांधी निराधार योजनेत दरमहा १००० रुपये देण्यात यावे, तसेच प्रत्येक दिव्यांग व्यक्ती लाभार्थ्याला घरकुल योजनेचा लाभ द्यावा, बेरोजगार दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना राबवावी, जिल्हा कार्यालयात होत असलेल्या बैठकांमध्येही दिव्यांगांनाही सहभागी करुन घेण्यात यावे, शिवाय दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या, तीन चाकी, दुचाकी, काठ्या व शैक्षणिक सुविधा देण्याच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. यावेळी दिव्यांग प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास लढे, बालाजी पवार आदी हजर होते.

Web Title:  Hingoliite Divyanang's Bombay Babon movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.