हिंगोलीच्या वारकऱ्यांच्या वाहनास अपघात; एका भाविकाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 04:24 PM2019-07-12T16:24:21+5:302019-07-12T16:49:14+5:30

शेषराव पिनगाळे या भाविकाचा जागीच मृत्यु झाला. 

Hingoli warkari's vehicle accident; Death of a devotee on the spot | हिंगोलीच्या वारकऱ्यांच्या वाहनास अपघात; एका भाविकाचा जागीच मृत्यू 

हिंगोलीच्या वारकऱ्यांच्या वाहनास अपघात; एका भाविकाचा जागीच मृत्यू 

Next

सेनगाव (हिंगोली ) : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील वारकऱ्यांच्या वाहनास माजलगाव येथे शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अपघात झाला. यात शेषराव पिनगाळे या भाविकाचा जागीच मृत्यु झाला. 

तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी शुक्रवारी संध्याकाळी पिकअप वाहनातून निघाले होते. माजलगावजवळ चालकास डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण गेले. गाडी रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा उलटली. यात गाडीतील भाविक जखमी झाले.  दरम्यान, शेषराव पिनगाळे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला जबर मार लागला असून अन्य तिघे किरकोळ जखमी आहेत. जखमींवर उपचारासाठी माजलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Hingoli warkari's vehicle accident; Death of a devotee on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.