हिंगोली आगारात ‘इंधन’ बचत मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:05 AM2018-01-17T00:05:21+5:302018-01-17T00:05:24+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील एसटी डेपोत इंधन बचत मोहीम राबविली जाते. १६ जानेवारी रोजी हिंगोली आगारात इंधन बचत मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. गतवर्षी हिंगोली आगाराने इंधन बचतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

 Hingoli commencement of 'fuel' savings campaign in Agartala | हिंगोली आगारात ‘इंधन’ बचत मोहिमेस प्रारंभ

हिंगोली आगारात ‘इंधन’ बचत मोहिमेस प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील एसटी डेपोत इंधन बचत मोहीम राबविली जाते. १६ जानेवारी रोजी हिंगोली आगारात इंधन बचत मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. गतवर्षी हिंगोली आगाराने इंधन बचतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
राज्य परिवहनच्या इंधन बचत मोहिमेस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. सर्वाेत्कृष्ट कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांना बक्षीस व सन्मान केला जातो.
हिंगोली डेपोत १६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास आगारप्रमुख पी. डी. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहनचे राऊत, पारीसकर, बी. बी. झरीकर, डी. डी. दराडे, एस. आर. पारीख, व्ही. व्ही. वरवंटे, गजानन सांगळे, एम. बी. देशमुख, लतीफ पठाण तसेच आगारातील वाहक, चालक व यांत्रिकी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंधन बचतीचे महत्त्व या विषयावर हिंगोली आगाराचे पी. डी. चव्हाण यांनी मार्गदर्शन करत वाहक, चालकांशी संवाद साधला.
कर्मचाºयांना मार्गदर्शन
सदर कार्यक्रमात इंधन बचतीचे महत्त्व, वाहन चालवितांना घ्यायची दक्षता, व इतर तांत्रिक बाबी याबाबत मान्यवरांनी वाहक व चालकांना सखोल मार्गदर्शन केले. बसमधील अचानक झालेला बिघाड किंवा तांत्रिक अडचणी आल्यावर नेमके वाहक चालकांनी काय कारावे, याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी इंधन बचत मोहिमेत सर्वांनी सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title:  Hingoli commencement of 'fuel' savings campaign in Agartala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.