इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:43 AM2018-04-23T00:43:17+5:302018-04-23T00:43:17+5:30

उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. निष्काळजीपणा जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळे कुलरचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

 Handle electronic equipment! | इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळा जपून !

इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळा जपून !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. निष्काळजीपणा जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळे कुलरचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
कूलरमधील माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कूलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी ओढले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कूलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कूलर पंप अधूनमधून बंद करावा. कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कूलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. कूलर पूर्णपणे सुरक्षित हाताळल्यास होणाऱ्या दुर्घटना रोखू शकणे शक्य आहे. त्यामुळे सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आहे.
कूलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा, त्यामुळे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्वीच चालू करावे. त्यानंतर कूलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कूलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कूलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमी सुरक्षित अंतरावर ठेवावे व ते या ठिकाणी खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाºया इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. त्यामुळे विजेची बचत होते, असे महावितरण तर्फे सांगण्यात आले.

Web Title:  Handle electronic equipment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.