हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:06 AM2018-07-17T01:06:40+5:302018-07-17T01:06:55+5:30

शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

 Haj pilgrims hingoli vaccination | हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण

हज यात्रेकरूंचे हिंगोलीत लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील पेन्शपुरा भागातील मेराजुलउलूम मस्जिदे येथे हज साठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले होेते. यामध्ये एकूण १३५ मुस्लिम बांधव हजसाठी रवाना होणार आहेत. त्यांना अनेक धर्मगुरु व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राजमुहम्मद तांबोळी, अस्कर मिर्झा, सलीम इंजीनियर, मिर्झा रफअत बेग, डॉ. रहीमोद्दीन मुफ्ती कदीर तर प्रमुख पाहुणे म्हणून शल्यचिकित्सक किशोर श्रीवास, मंगेश टेहरे, गोपाल कदम, शेळके आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शासनातर्फे हजयात्रेकरुना मास्तिष्क ज्वर लस, पोलीओ डोस देण्यात आला. तर हाफिज मु. सालार यांनी मार्गदर्शन केले. सुचत्रसंचालन मुसद मिर्झा यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष इरफान वासेसा, हबीब बागवान, शफी गुत्तेदार, बाबूभाई, डॉ. जहिरोद्दीन, पठाण असगर, स. फरहान, शेख सलीम, टी. सी. मुसा सागर, जहीर ईटवाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Haj pilgrims hingoli vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.