गट-क कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रितचा दर्जा प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:14 AM2018-10-23T00:14:47+5:302018-10-23T00:15:50+5:30

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत असणा-या गट क कृषी अधिकाºयांना आता राज्य शासनाने राजपत्रिक अधिका-याचा दर्जा प्रदान केला असून यापुढे या पदाची भरती लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे.

 Group-C Gazetted status to agricultural officers | गट-क कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रितचा दर्जा प्रदान

गट-क कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रितचा दर्जा प्रदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत असणा-या गट क कृषी अधिकाºयांना आता राज्य शासनाने राजपत्रिक अधिका-याचा दर्जा प्रदान केला असून यापुढे या पदाची भरती लोकसेवा आयोगाकडून केली जाणार आहे.
जि.प.च्या कृषी अधिकारी या तांत्रिक पदाची भरती यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत केली जायची. तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना नियुक्ती देत असत. मात्र ग्रामविकास विभागाच्या ११ आक्टोबरच्या निर्णयान्वये जि.प.कडील कृषी अधिकाºयांना वर्ग-२ चा दर्जा प्रदान केला आहे.
महाराष्ट्र राज्य जि.प. कृषी तांत्रिक संघटनेकडून यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याला शासनाने प्रतिसाद दिल्याचे त्यांनी पत्रकान्वये कळविले आहे. यामुळे राज्यातील ६४0 जणांना हा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांचा फायदा होणार आहे. शिवाय हे कर्मचारी आता राज्य कर्मचारी म्हणून गणले जाणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title:  Group-C Gazetted status to agricultural officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.