‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:00 PM2019-05-20T14:00:48+5:302019-05-20T14:03:56+5:30

वसमत तालुक्यतील घटनेचा झाला उलगडा 

'That Girl' does not fall under the train, but the murdered | ‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून

‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून

Next
ठळक मुद्दे१२ मे रोजी नांदेड येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी रेल्वेतून पडून मृत्यू शवविच्छेदन अहवालात मुलीचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील पिंपळा चौरे शिवारात १२ मे रोजी नांदेड येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी रेल्वेतून पडून मयत झाल्याची घटना घडली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले. गळा आवळून रेल्वेतून ढकलून खून केल्याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे रेल्वे रुळावर श्रावणी मारोती कदम (१७, विनायक नगर नांदेड) या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला होता. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. मयताच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसास प्राप्त झाला. यात मयताचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. मयत मुलीचा गळा दाबून खून केल्यावर तिला रेल्वेतून ढकलून दिले असल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारावरून वसमत ग्रामीण पोलिसांनी सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी सपोउपनी दिगंबर कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अपघाताचा बनाव
शवविच्छेदन अहवालावरून या खुनाला वाचा फुटली आहे. आता हा खून कोण्या कारणावरून झाला व आरोपी कोण आहेत हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. सदर विद्यार्थिनीला कोणाचा त्रास होता का, कोणी टारगट त्रास देत होते का? अशा प्रकरणातून हा खून झाला की कसे, हे तपासात निष्पन्न होईल.

Web Title: 'That Girl' does not fall under the train, but the murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.