अपघातात चौघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:50 PM2019-01-25T23:50:47+5:302019-01-25T23:51:04+5:30

हट्टा ते जवळाबाजार दरम्यान शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आडगाव रंजे ते बोरी सावंत पाटीजवळ एका दुचाकीचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविले. अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

 Four injured in the accident | अपघातात चौघे जण जखमी

अपघातात चौघे जण जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आडगाव रंजे : हट्टा ते जवळाबाजार दरम्यान शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आडगाव रंजे ते बोरी सावंत पाटीजवळ एका दुचाकीचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविले. अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.
आडगावजवळ जवळा बाजारकडून येणाऱ्या दुचाकी एमएच- ४ -जी ९१४०वरून येणाºया सतीश गुंडे (रा. साळणा ता. औंढा नागनाथ) याने हट्टाकडून जवळा बाजारकडे जाणाºया दोन मोटार सायकलींना धडक दिली. अपघातात दोन महिला व दोन पुरूष जखमी झाले. प्रभाकर नागोराव गारकर (रा. अनखळी ता. औंढा), राम बापूराव चव्हाण (रा. अनखळी) तसेच दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना जवळा बाजार येथील खाजगी रुग्णालयात पाठविले आहे. घटनास्थळी आडगावच्या तरुणांनी जखमींना मदत केली.

Web Title:  Four injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.