In the first installment, the house is stuck | पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले
पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.
घरकुल योजनेतील रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. अनेकजण पंचायत समितीच नव्हे, जिल्हा परिषदेच्या घिरट्या घालताना दिसत आहेत. यात २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवासचे १0४७ तर रमाईचे ११८७ एवढे उद्दिष्ट होते. प्रधानमंत्री आवासमध्ये ५३३ कामांना मंजुरी दिली व ४८३ जणांचे जिओ टॅगिंग झाले. ३४७ जणांना पहिला तर १७ जणांना दुसरा हप्ता दिला. ४९३ जणांची खातेपडताळणी झाली. उर्वरितांचे मात्र अजून कशातच काही नाही. रमाई घरकुलमध्ये तर केवळ ३३ जणांचीच नोंदणी झाली. कामाचा पत्ता नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून होणारी ओरड रास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२0१६-१७ चा विचार केला तर प्रधानमंत्री आवासमध्ये ३७१५ एवढे उद्दिष्ट होते. यापैकी ३४८४ जणांना मंजुरी मिळाली होती. ३३१३ जणांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यापैकी केवळ एकालाच चौथा हप्ता मिळाला. यात ८७९ घरकुल पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. याच वर्षातील रमाई योजनेतील १0७९ घरकुलाच्या उद्दिष्टापैकी १0४२ ला मंजुरी दिली होती. त्यापैकी ९६७ जणांना पहिला हप्ता मिळाला. १९४ जणांना तिसरा हप्ता दिला.
यात २१९ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शब्री घरकुल योजनेत उद्दिष्टातील सर्व २२७ घरकुल मंजूर झाले. २२१ जणांना पहिला तर यापैकी ५८ जणांना तिसरा हप्ता दिला. ६३ कामे पूर्ण झाली. पारधी घरकुलमधील १३ कामांपैकी ५ कामे तिसºया हप्त्यापर्यंत पोहोचली. ही कामे पूर्णही झाली.
अडचण : ५ हजारांपैकी ११६६ पूर्ण
या योजनेत २0१६-१७ चा विचार केला तर विविध योजनांत ५0३४ घरकुलांना मंजुरी दिली. यापैकी ५३७३ जिओ टॅगिंग केलेले आहेत. ४५११ जणांना पहिला हप्ता दिला. पाचशे जण अजून पहिला हप्ताच न मिळालेले आहेत. तर तिसरा हप्ता दिलेले केवळ ९८0 जण आहेत. त्यामुळे चार हजार घरकुल
लाभार्थी निधीअभावी चाचपडताना दिसत आहेत. प्रशासनाकडून मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. अनेकांचे बँक खातेच जुळत नसल्याचेही समोर येत असून ही अडचण दूर करण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे.


Web Title:  In the first installment, the house is stuck
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.