अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:49 AM2019-01-14T00:49:30+5:302019-01-14T00:50:04+5:30

येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली.

Finance Minister Sudhir Mungantivar launches various works | अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध कामांना प्रारंभ

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध कामांना प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोली : जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन

हिंगोली : येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली.
गांधी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमासह इतर ठिकाणी पालकमंत्री दिलीप कांबळे, जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी.तुम्मोड, माजी आ.गजानन घुगे, शिवाजी जाधव, नगरसेवक गणेश बांगर, अनिल नेनवाणी, उमेश गुट्टे, नाना नायक, बिरजू यादव, अनिता सूर्यतळ, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे आदी उपस्थित होते.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, मराठवाड्याचा जावई म्हणून मी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी देण्याचे जे आश्वास दिले होते. त्यापैकी आतापर्यंत ४३ कोटी दिले असून उर्वरित सात कोटींचा निधी फेबु्रवारीत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. हिंगोली शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन हम साथ साथ है या चित्रपटाच्या नावासारखे काम करणे गरजेचे असून तसे हिंगोली पालिकेतील चित्रही आहे. प्रत्येकांनी हम आपके है कोण असे न म्हणता, राजकीयद्वेष, जात-पात बाजूला सारून विकासासाठी सदैव एकत्र आले पाहिजे असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले. अनुशेषासाठी आ.मुटकुळे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करून जलेश्वर तलावाच्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नातही मदतीचे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले, निधी जाहीर केला अन् तो दिला असे होतच नसल्याचे बहुदा दिसते. मात्र मुनगंटीवार यांनी शब्द पाळला. जलेश्वर तलावाचा विकास पुनर्वसनानंतरच करू, असेही ते म्हणाले.
यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शहरासह जिल्ह्याचा विकास भाजपच्या काळातच होत असल्याचे सांगितले. तर अंतर्गत रस्त्यांचे १0२ कोटी, नर्सी नामदेवला २५ कोटी मिळतील, असा विश्वास दिला. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानून जलेश्वर तलाव विकासासाठी निधीची मागणी केली. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आभार नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी मानले.
अनेकांची पाठ
या कार्यक्रमास शहरातील अनेक नगरसेवकांनी पाठ दाखविल्याचे दिसून आले. सर्वपक्षीय एकी सांगितली जात असली तरीही त्यांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन
हिंगोली शहरातील कै. शिवाजीराव देशमुख यांचे नवीन सभागृह इमारतीचे बांधकाम केले जात आहे. सदरील सभागृहाचे लोकार्पण करताना कै. शिवाजीराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मिलींद उबाळे, विशाल इंगोले, शिवाजी ढाले, रवी पाईकराव, अ‍ॅड. हर्ष बनसोडे आदींनी केली.
तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी निवृत्ती वेतन व इतर विविध मागण्या मंजूर कराव्यात. यासंदर्भाचे निवेदन महाराष्ट राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. निवेदनावर युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मांडगे, जिल्हा सचिव ओमप्रकाश बनसोडे यांच्यासह पदाधिका-यांची स्वाक्षरी आहेत.
दिलीपराव मित्र !
४उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण हे राष्टवादीचे असले तरीही आमचे मित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडचे हे संबंध आहेत. मात्र कुणी त्यावर काय अर्थ काढत असेल तर खुशाल काढा. ते मित्रच राहतील. अशी गुगली पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टाकली.

Web Title: Finance Minister Sudhir Mungantivar launches various works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.