आॅनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:16 AM2019-03-23T00:16:46+5:302019-03-23T00:17:00+5:30

जिल्ह्यात आरटीई २५ टक्केसाठी ७०९ जागा रिक्त असून या जागांसाठी पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. या तारखेत बदल करण्यात आला असून आॅनलाईन अर्जासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज ३० मार्चपर्यंत करता येणार आहेत.

 Extension for online admission application | आॅनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

आॅनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात आरटीई २५ टक्केसाठी ७०९ जागा रिक्त असून या जागांसाठी पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. या तारखेत बदल करण्यात आला असून आॅनलाईन अर्जासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज ३० मार्चपर्यंत करता येणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदनित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. दरवर्षी प्रमाणे २०१९-२० या वर्षीची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात येणार असून पडताळणी समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहेत. २०१९-२० या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन शाळांनी नोंदणी केली आहे. एकूण ७०९ जागा आरटीई २५ टक्केसाठी रिक्त आहेत.
पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी यापुर्वी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. परंतु विविध संघटना व पालकांच्या मागणीनुसार सदरच्या तारखेत वाढ करण्यात आली असून आता पालकांना ३० मार्च २०१९ पर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तारखेच्या मुदतवाढीसंदर्भात तसे पत्रही काढले आहे.

Web Title:  Extension for online admission application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.