अकरा जिल्ह्यात वीजबिल दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:09 AM2018-02-19T00:09:27+5:302018-02-19T00:09:30+5:30

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज ग्राहकांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

 Electricity repair in the eleven district | अकरा जिल्ह्यात वीजबिल दुरूस्ती

अकरा जिल्ह्यात वीजबिल दुरूस्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज ग्राहकांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
महावितरणकडून जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसूली व वीजबिल दुरूस्ती मोहिम राबविली जात आहे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायीक विद्युत ग्राहकांकडील थकित वीजबिल वसूलीसाठी कंबर कसली असून वीजबिलातील दुरूस्तीचे आवाहन करण्यात आले.
महावितरण औंरगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, उच्चदाब ग्राहक, कृषीपंप ग्राहक, थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई राबविण्यात येत आहे. यात ग्राहकांच्या वीजबिला संबंधी तक्रारी असल्यास दुरूस्तीसाठी महावितरणकडून सर्व शाखा व उपविभागीय कार्यालयात ग्राहकांकडून वीज बिलासंबंधी तक्रारी कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जात आहेत. शिवाय तक्रारींची दखल घेत बिलात दुरूस्ती केली जात आहे. जास्तीत जास्त ज्या कोणी वीजग्राहकांच्या अशा तक्रारी असतील त्यांनी याबाबत माहिती सादर करावी. अन्यथा ऐनवेळी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करतांना वीज बिलासंबंधी असणाºया तक्रारींची कोणतीही सबब ऐकून घेण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
तक्रारींची तात्काळ शहानिशा करून वीज बिल दुरूस्ती करण्यात येत आहेत. वीज ग्राहकांच्या बिलासंबंधी तक्रारी असतील. अशा ग्राहकांनी वीज बिलाची सत्यप्रत व तक्रार अर्ज महावितरणच्या जवळच्या कार्यालयात दाखल करावे.
जुन्या वीज बिलांच्या तक्रारी माहे मार्च २०१८ पर्यंतच जवळच्या महावितरण कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर येणाºया तक्रारींची दखल घेण्यात येणार नाही.

Web Title:  Electricity repair in the eleven district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.