संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:59 AM2018-07-17T00:59:26+5:302018-07-17T00:59:42+5:30

जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.

 Due to the continuous rains, life-threatening disruption | संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून रोजच होणाºया पावसामुळे शेतीची कामे एकीकडे ठप्प असताना व्यापारावरही त्याचा परिणाम होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील लोकांचा कामानिमित्त शहराकडे येण्याचा ओघ मंदावत असल्याने दुपारी पावसामुळे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या संततधार पावसामुळे आता पिकांना धोका उद्भवतो की काय, अशी भीती शेतकºयांना लागली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनी चिभाडण्याच्या मार्गावर आहेत. कायम पाणी साचून राहणाºया ठिकाणी शेतात पिके पिवळी पडली आहेत. शिवाय कोळपणीसह निंदणीही करता येत नसल्याने काही ठिकाणी पिकांपेक्षा तणच जास्त वाढल्याचे चित्र आहे. ज्यांची पहिल्या टप्प्यात निंदणी अथवा कोळपणी झाली, अशा शेतकºयांची पिके मात्र चांगलीच तरारली. त्यांनाही आता अतिपावसाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहत होती. नर्सी नामदेव, बासंबा, भांडेगाव येथेही पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दुपारी मुसळधार पाऊस झाला. सेनगाव, सवना, वरूड चक्रपान या भागातही या पावसाचा जोर होता. केंद्रा बु.
औंढा नागनाथ तालुक्यात औंढ्यासह जवळा बाजार परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी पावसाचा जोर जास्त होता.
कळमनुरीसह बाळापूर, नांदापूर परिसरात दिवसभर कधी रिमझिम तर कधी रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळा पांचाळ, डोंगरकडा परिसरात मात्र नुसतेच ढगाळ वातावरण होते.
वसमत तालुक्यात वसमतसह कौठा, हट्टा, आडगाव रंजे आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.
पोत्र्यात कामे खोळंबली
पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात सततधार पाऊस पडण्याचा आजचा हा बारा वा दिवस असल्याने शेतीतील अनेक कामे खोळंबली आहेत. ५ जुलैपासून पोत्रा भागात रिमझीम पडत आहे. या रिमझिम संततधार पावसामुळे सुरुवातीला खरीप पिकांना जीवदान मिळाले होते, पण या पावसामुळे मूग, उडीद, कापूस, ज्वारी यासारखी पिके पिवळी पडत असुन, बहुतांश शेतात आता पाणी साचत आहे .
काही शेतांना आता डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे. या सततधार पावसायुळे पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.
कळमनुरी : शहर व परिसरात १६ जुलै रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने आठवडी बाजारावर याचा चांगलाच परिणाम झाला. कळमनुरीत सोमवारी आठवडी बाजार भरतो. पावसाची रिपरिप सुरू असल्याने व्यापाºयांनी कमी दुकाने
थाटली होती. ग्राहकही कमी प्रमाणात आले. दुपारी पडलेल्या पावसामुळे बाजार उठल्यातच जमा होते. बाजारात जाण्यापेक्षा नागरिकांनी घरी बसणेच पसंद केले. बाजारपेठेवरही या पावसाचा परिणाम झाला. दुकानदार नुसतेच ग्राहकांची वाट पाहत बसले होते.
विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र आज दुपारनंतर होते. त्याचप्रमाणे हिंगोलीनजीक वाहणारी कयाधूही दुथडी वाहू लागली होती.

Web Title:  Due to the continuous rains, life-threatening disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.