दुष्काळाची दाहकता; पाणी भरताना ६० फुट खोल विहिरीत पडल्याने मुलगी जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:56 PM2019-05-11T12:56:19+5:302019-05-11T12:56:50+5:30

शीतल इंगळे असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

drought effect; The girl was injured in a 60-foot-deep well-dug well after filling the water in Hingoli | दुष्काळाची दाहकता; पाणी भरताना ६० फुट खोल विहिरीत पडल्याने मुलगी जखमी  

दुष्काळाची दाहकता; पाणी भरताना ६० फुट खोल विहिरीत पडल्याने मुलगी जखमी  

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील भानखेड़ा येथे शेतातील विहिरीतून पाणी भरताना एक १६ वर्षीय मुलगी शनिवारी (दि. ११ ) सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पाय घसरून विहिरीत पडली. शीतल इंगळे असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

संपूर्ण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. भानखेडा येथे सुद्धा भीषण पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत. गावाच्या जवळ असलेल्या एका शेतातील विहिरीतून ग्रामस्थ पिण्याचे पाणी भरतात. आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शीतल या विहिरीवर पाणी भरत होती. यावेळी अचानक पाय घसरून तोल गेल्याने ती ६० फुट खोल असलेल्या विहिरीत पडली. शीतलने मदतीसाठी आरडाओरडा केला असता शेजारील शेतात काम करत असलेले कोरडे पितापुत्र मदतीला धावून आले. प्रसंगावधान राखून अविनाश कोरडे या युवकाने विहिरीत जात शीतलला बाहेर काढले. यानंतर शीतलला तात्काळ सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: drought effect; The girl was injured in a 60-foot-deep well-dug well after filling the water in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.