डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विधिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:35 AM2019-01-21T00:35:51+5:302019-01-21T00:36:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना बुलडाणा येथील माजी न्यायाधीश तथा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुरेश घोरपड यांनी केले.

 Dr. Dr. Babasaheb Ambedkar is the world's greatest lawmaker | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विधिज्ञ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विधिज्ञ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना बुलडाणा येथील माजी न्यायाधीश तथा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुरेश घोरपड यांनी केले.
हिंगोली शहरातील महावीर भवन मधील स्मृतिशेष राजकुमार नागोराव इंगोले विचारमंचावर बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत ‘महान कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर घोरपड बोलत होते. ते म्हणाले हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या महिलांना समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हिंदू कोड बिल निर्माण केले परंतु महिलांच्या उत्थानासाठी असलेले हिंदू कोडबिल मान्य न झाल्यामुळे तसेच ओबीसी च्या हक्क आणि अधिकाराकरीता आयोग नेमण्यात न आल्यामुळे त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते की, समाजातील विविध घटकांच्या सामाजिक गरजांची पूर्तता करणे, हेच कायद्याचे कार्य असते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत असे उदगार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष बाबाराव बांगर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी ए. जी. खान, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. एन. अग्रवाल, अ‍ॅड. अनिल इंगळे, अ‍ॅड. सुनील खंदारे, अ‍ॅड. बनसोडे, अ‍ॅड. दिवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. धम्मपाल खंदारे यांनी केले.
व्याख्याता यांचा परिचय अ‍ॅड. साहेबराव शिरसाट यांनी करून दिला. तर त्रिशरण पंचशील अशोक इंगोले यांनी म्हटले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, उपाध्यक्ष-कैलास भुजंगळे, सुभाष भिसे, प्रा. डॉ. किशोर इंगोले, प्रा. डॉ. सचिन हटकर, डॉ. भगवान पुडंगे, भीमराव कुरवाडे, मनोहर वाकळे, बाबूराव काळे, अंतिदास इंगोले व मंडळातील सर्व पदधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Dr. Dr. Babasaheb Ambedkar is the world's greatest lawmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.