माथाड्यांनी दिले जिल्हा प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:32 AM2018-12-13T00:32:47+5:302018-12-13T00:32:59+5:30

बाजार समिती क्षेत्रात कार्यरत राज्यभरातील मापाड्यांच्या नोकरीवर गदा आणणाऱ्या पणन संचालकांच्या पत्रास स्थगिती देण्याची मागणी मापाड्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

 District Administration issued a memorandum | माथाड्यांनी दिले जिल्हा प्रशासनास निवेदन

माथाड्यांनी दिले जिल्हा प्रशासनास निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बाजार समिती क्षेत्रात कार्यरत राज्यभरातील मापाड्यांच्या नोकरीवर गदा आणणाऱ्या पणन संचालकांच्या पत्रास स्थगिती देण्याची मागणी मापाड्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
बाजार समितीतील इलेक्ट्रॉनिक, भईकाट्यावरील तोलाई कपातीस पणन संचालकांनी १६ डिसेंबर २0१४ रोजी स्थगिती दिली होती. मात्र महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाने या पत्रकाविरुद्ध आंदोलनाचा इशारा देताच ते स्थगित केले होते. आता पुन्हा ती स्थगिती हटविल्याचे पत्र जारी केले. त्यामुळे मापाड्यांच्या नोकºया संपुष्टात येणार आहेत. बाजार समितीने मापाड्यांना बाजार समितीत सामावून घेत नोकर म्हणून घोषित करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. तर शासकीय गोदामात कंत्राटी पद्धतीने माथाड्यांची नेमणूक करू नये, अशी मागणीही केली. निवेदनावर नंदू लव्हाळे, संदीप डांगे, वसंता वाघ, चांद प्यारेवाले, मधुकर कानबाळे, सोनाजी शिखरे, तान्हाजी बांगर, आशिष जैस्वाल, विनोद बांगर, विनायक बांगर, शे.मुस्तफा आदींच्या सह्या आहेत.

Web Title:  District Administration issued a memorandum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.