Distribution of pesticide tablets to three and a half lakh children | साडेतीन लाख बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात १० फेबु्रवारी रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत शाळा व अंगणवाडीतील १ ते १९ वयोगटातील ३ लाख ६१ हजार १४८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. आरोग्य विभाग, महिला बालकल्याण तसेच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप संदर्भात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कचेरीत राष्ट्रीय जंतनाशकदिनी जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग व शिक्षण विभाग आदि विभागातील अधिकारी उपस्थित होते.
आहार घेतल्यानंतरच गोळी खाऊ घालणे, रिकाम्यापोटी गोळी खाऊ घालू नये, बालक आजारी असल्यास गोळी देवू नये, गोळी दिल्यानंतर दोन तास त्यांना शाळा-अंगणवाडीत थांबवून ठेवावे, यावेळी काही दुष्परिणाम आढळून आल्यास क्षार संजीवनी पाजावे व त्वरित वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारी तसेच १०८, १०२, १०४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा. ज्या लाभार्थीच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त असतात. त्या मुलांना गोळी खाल्यानंतर किरकोळ त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदा. मळमळ होणे, सौम्य पोटदुखी होणे, तेव्हा घाबरून न जाता तत्काळ डॉक्टर किंवा कर्मचाºयास सांगावे, गोळी नातेवाईकांच्या हातात देण्यात येवू नये, तसेच घरी घेवून जाऊ देवू नये,
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा असल्याचे सांगण्यात आले.
जंतनाशक गोळीचे फायदे
४रक्तक्षय (अनेमिया) कमी होतो. शारीरिक व बौद्धिक वाढ सुधारण्यास मदत होते. बालकांची पोषण स्थिती चांगली राहते. अंगणवाडीतील लाभार्थींना गोळीची भुकटी करुन पाण्यात विरघळून अंगणवाडी कार्यकर्तीसमोर देण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकासमोर गोळी चावून खाण्यास सांगण्यात येणार आहे. सर्व शासकीय, शासकीय अनुदानित, खाजगी शाळामंध्ये आणि अंगणवाडी केंद्रात नि:शुल्क उपलब्ध आहे.


Web Title:  Distribution of pesticide tablets to three and a half lakh children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.