रमजाननिमित्त फळांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:35 AM2018-05-22T00:35:55+5:302018-05-22T00:35:55+5:30

मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत.

 The demand for fruits on Ramadan | रमजाननिमित्त फळांना मागणी

रमजाननिमित्त फळांना मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत.
यामध्ये खरबूज, टरबूज, चिकू, पपई, नारळ, अंगूर, आंबा आदी प्रकारची फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. यंदाही इंधन दरवाढीमुळे उन्हाळी फळांचे भाव वाढल्याचे फळ विक्रेते खलील बागवान यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंदा रमजान महिना उन्हाळ्यातच आला असल्याने तहानेने जीव व्याकूळ होऊ नये म्हणून पहाटेच्या आहारात फळांचा सर्वाधिक वापर केला जातो.
असे आहेत फळांचे दर
टरबूज २० ते ३० रुपये किलो, पपई ४० रुपये किलो, अंगूर १०० रुपये कि., चिकू ४० रुपये कि., केळी ४० ते ५० रुपये डझन, सफरचंद १०० ते १२० रुपये किलो, नारळ ३० ते ४० रुपये नग, आंबा ५० पासून १०० रुपये किलो आदी प्रकारच्याही फळांचे भाव वाढलेले आहेत.

Web Title:  The demand for fruits on Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.