The death of the youngster gets crushed under the truck | ट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू
ट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
औरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या कंटनेर क्रमांक एच.आर. ५५ एक्स ३१५९ च्या चालकाने नांदेडहून गावाकडे दुचाकीवरून येत असताना पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोबीनखाँ पठाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटनेर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास मालेगावजवळ पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा पोकाँ मिरासे यांनी करून प्रेत शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे.


Web Title:  The death of the youngster gets crushed under the truck
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.